केरळ मधील सर्वोत्तम ५ पर्यटन स्थळे...


 केरळ मधील सर्वोत्तम ५ पर्यटन स्थळे...

        केरळ राज्य आपल्या अमर्याद निसर्गसौंदर्य,लहान-मोठे तलाव, कॉफीच्या बागा, बैकवाटर,हत्तींचे कळप, या व अशा ब-याच वैशिष्ठ्यांमुळे दरवर्षी लाखो पर्यटकांना केरळ आपल्याकडे आकर्षून घेते. 

                      हनिमून ट्रीप असुद्या अगर कौटुंबिक, सुट्टीमध्ये फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे केरळ मध्ये आहेत. निसर्गरम्य वातावरणाबरोबरच मन:शांती चा अनुभव केरळ मध्ये नक्कीच मिळतो.


  • केरळ मधील पर्यटन स्थळे: 

  1. मुन्नार
  2. कोची
  3. त्रिवेन्दम:
  4. पेरियार नेशनल पार्क
  5. वर्कला

    मुन्नार

               उन्हाळ्याच्या दिवसात पर्यटक या थंड हवेच्या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी येतात.इको पॅाईंट,अत्तुकडी धबधबा,मुट्टीपुट्टी तलाव,पोथामेडू पॅाईंट. टी म्यूझियम ही काही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत.
                केरळ मधील मुन्नार या थंड हवेच्या ठिकाणाबद्दल तुम्ही ऐकले असेल किंवा चित्रपटातून मुन्नार चे निसर्ग सौंदर्य पाहिले असेल.उंच डोंगरावर असलेले मुन्नार हे (Honeymoon Destination) म्हणून ओळखले जाते. 
                पुणे ते मुन्नार आंतर १२२१ किमी आहे.  गुगल मॅप पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

                 कोची मध्ये कोची किल्ला, कला संग्रहालय,चेराई बीच ही काही पाहण्यासाठी असलेली ठिकाणे आहेत.विशेषतः चायना फिशिंग नेट ने केलेली मासेमारी पाहण्यासाठी पर्यटक कोची ला आवर्जून भेट देतात. खरेदीसाठी कोची प्रसिद्ध असून कपडे,शोभेच्या वस्तू,दागदागिने यांची खरेदी पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात.

             अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले कोची हे शहर कोचीन या नावानेही ओळखले जाते.पोर्तुगीजांच्या राजवटी पासून कोची हे प्रसिध्द असे बंदर आहे.आजही इथून आयात-निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. 
                        
                पुणे ते कोची आंतर १२८६ किमी आहे.  तसेच मुन्नार ते कोची आंतर १२७ किमी आहे. गुगल मॅप पाहण्यासाठी यावर क्लिक करा.


    best places to visit in Kochi 


    त्रिवेन्दम:

                    त्रिवेन्द्रम किंवा तिरुवनंतपुरम ही केरळ ची राजधानी असून पर्यटना साठी अत्यंत सुंदर शहर आहे.प्रसिध्द असे पद्मनाभस्वामी मंदिर या शहरात असून आपल्या अमर्याद संपत्ती मुळे देशभरात प्रसिद्ध आहे.

                  पद्मनाभ स्वामी मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला दुपारी १२ च्या आत जावे लागेल,कारण दुपारी १२ नंतर मंदिर दर्शनासाठी बंद होते. त्रिवेन्द्रम मध्ये नेपियर संग्रहालय,समुद्र किनारा व शहरातील ब्रिटीश वास्तुकलेच्या इमारती पाहण्यासारख्या आहेत.
                    
                    पुणे ते त्रिवेन्दम: आंतर १५४१ किमी आहे.  तसेच कोची ते त्रिवेन्दम आंतर १९९ किमी आहे. गुगल मॅप पाहण्यासाठी यावर क्लिक करा.



    पेरियार नेशनल पार्क

                केरळ मधील पेरियार नेशनल पार्क हे पर्यावरण प्रेमी पर्यटकांसाठी भेट दिलीच पाहिजे असे ठिकाण आहे. ९२५ वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे अभयारण्य प्रामुख्याने वाघ आणि हत्तींसाठी प्रसिद्ध आहे.
             
             या अभयारण्यात वाघ आणि हत्तींसह ३५ प्रकारचे वन्यप्राणी,मलबार-ग्रे-हॉर्नबिल सह २६६ प्रकारचे पक्षी,किंग कोब्रा सह ४५ प्रकारचे सरीसृप व १६० प्रकारचे कीटक व फुलपाखरे पाहायला मिळतात.
                  
           पेरियार अभयारण्या जवळच कॉफी व मसाल्याच्या बागा आहेत,जिथून आपण कॉफी व मसाल्याची खरेदी करू शकतो.



                पुणे ते पेरियार नेशनल पार्क आंतर १३६८ किमी आहे. तसेच त्रिवेन्दम ते पेरियार नेशनल पार्क आंतर १६८ किमी आहे. गुगल मॅप पाहण्यासाठी यावर क्लिक करा.


    वर्कला

                  तुम्हाला जर समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवायला आवडत असेल तर वर्कला बीच तुमच्या साठी उत्तम आहे. केरळ मधील सर्वात सुंदर बीच आहे वर्कला बीच या समुद्रकिनार्यावरून सूर्यास्ता चे दृश्य अप्रतिम दिसते. इथे तुम्ही जल क्रीडा करू शकता. वर्कला मध्ये जनार्दन स्वामी मंदिर, विष्णू मंदिर, शिवगिरी मठ इत्यादी पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.

                    पुणे ते वर्कला आंतर १५२५ किमी आहे. तसेच त्रिवेन्दम ते वर्कला नेशनल पार्क आंतर ४२ किमी आहे. गुगल मॅप पाहण्यासाठी यावर क्लिक करा.





    केरळ ला कसे जावे?

                दक्षिण भारतातील केरळ हे राज्य पर्यटनामध्ये अग्रेसर असल्याने वाहतूक व दळणवळणाच्या चांगल्या सोयी मिळतात. विमानमार्ग, लोहमार्ग व रस्तामार्ग तिन्ही प्रकारे केरळ ला जाता येते.

            विमानमार्ग: केरळ मधील कोची, तिरुअनंतपुरम व कोझिकोड हे तीन प्रमुख विमानतळ असून कोची व तिरुअनंतपुरम या दोन्ही विमानतळा वरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा नियमित सुरु असते,तर कोझिकोड या विमानतळावरून देशांतर्गत व आखाती देशांसाठी विमानसेवा उपलब्ध असते.

            लोहमार्ग: केरळ मधील तिरुअनंतपुरम, एर्नाकुलम, कोल्लम, कोझिकोड ही प्रमुख रेल्वे स्टेशन असून देशातील मुंबई,दिल्ली,कोलकाता,चेन्नई या प्रमुख शहरांशी लोहमार्गाने जोडले गेले आहेत.
            
            राजधानी,दुरोन्तो,मेल एक्सप्रेस अशा जलद व आरामदायी रेल्वे केरळ ला जाण्यासाठी उपलब्ध असतात.केरळ मध्ये इतर २०० रेल्वे स्टेशन असून राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सहजतेने करता येतो.

               रस्ता मार्गाने : केरळ मध्ये रस्त्यांचे जाळे उत्तम असून मोटारीने अथवा बस ने पर्यटन करणे पर्यटक पसंत करतात.कधी समुद्राकडेने तर कधी गर्द हिरव्या वनराईतून,कधी बैक वाटर च्या कडेने तर कधी कॉफी च्या मळ्यातून प्रवास करणे हा सुखद अनुभव असतो.
           


    Comments

    Popular posts from this blog

    शिमला येथे फिरण्यासाठीची ५ उत्तम ठिकाणे....

    पुण्यात भेट देण्यासारखी ५ ठिकाणे.....